Wednesday, May 13, 2020

कोरोना update उस्मानाबाद

होम क्वारंटाईन केलेल्या नागरिकाच्या घरासमोर सुचना लावण्याचा निर्णय...

कोरोना च्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन मध्ये शिथिलता असल्यामुळे  सध्या  उस्मानाबाद शहरामध्ये  बाहेर गावाहून येणा-या नागरिकांची संख्या वाढत आहे व बाहेर गावाहून आलेल्या  नागरिकांची आरोग्य विभागाने तपासणी  केल्यानंतर कोरोना चा संसर्ग होऊ नये म्हणून त्यांना  #institutional_क्वारंटाईन किंवा #Home_क्वारंटाईन केल्यानंतर  होम क्वारंटाईन केलेले नागरिक हातावर मारलेले आरोग्य विभागाचे शिक्के पुसुन  घराबाहेर फिरताना आढळून आले आहेत  व आसपासचे लोक त्या व्यक्तीच्या किंवा घराच्या संपर्कात येत आहेत  या मुळे कोरोना संसर्गाचा धोका वाढू शकतो यासाठी नगर परिषदेच्या  वतीने होम क्वारंटाईन केलेल्या नागरिकांच्या घरासमोर सुचना ज्यामध्ये तो व्यक्ती बाहेर गावाहून कधी आला आहे व त्याचा क्वारंटाईन कालावधी कधी संपणार हा मजकूर लिहिलेले  (stikar) लावण्याचा निर्णय मा.  नगराध्यक्ष श्री. मकरंद राजेनिंबाळकर  यांनी घेतला  आहे यामुळे नागरिकांना समजु शकेल या घरात बाहेर गावाहून आलेला व्यक्ती आहे आणि त्याला क्वारंटाईन केले आहे व आपण त्याच्या संपर्कात यायचे  नाही  व त्या व्यक्तीनेही घराबाहेर पडू नये व इतर नागरिकांच्या संपर्कात जायू नये. बाहेर गावाहून येणा-या नागरिकांची संख्या पाहता येणारा काळ आपल्या उस्मानाबाद शहरासाठी खुप काळजी घेण्याचा काळ आहे त्यामुळे काळजी घ्या महत्वाचे काम असेल तरच घराबाहेर पडा बाहेर गावाहून आलेल्या नागरिकाचा किमान 14 दिवस संपर्क टाळा व प्रशासनास सहकार्य करा..🙏 

#होम_क्वारंटाईन 
#नगरपरिषद #उस्मानाबाद #धाराशिव #नगराध्यक्ष #मकरंद_राजेनिंबाळकर

No comments:

Post a Comment